Posts

Showing posts from April, 2017

महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुटी असते. हा मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. महाराष्ट्र दिनाचा इतिहास संपादन करा २१ नोव्हेंबर इ.स.१९५६ दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले. त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहीं मुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळ...

काय ताकद आहे हो, निरोप देण्यात काय ताकद आहे.

तीस वर्षांचा नवरा तुरूंगाच्या पलीकडे उभा आहे, जो पुढल्याच जन्मी बहुतेक भेटणार. आणि दाराच्या अलीकडे ही सव्वीस वर्षांची मुलगी उभी आहे, जिचा मुलगा ही आता ह्या सगळ्या गडबडीत वारला. ह्या दोघांनी एकत्र येऊन काय बोलावं.. सावरकरांनी एकच सांगितलं, "माई, काटक्या एकत्र करायच्या आणि घरटं बांधायचं, त्या घरट्यात पोराबाळांची वीण वाढवायची ह्याला जर संसार म्हणायचा असेल तर हा संसार.. कावळे, चिमण्या सगळेच करतात. आपल्या घरट्या पुरता संसार कोणालाही करता येतो, 'आम्हांला देशाचा संसार करता आला यात धन्यता माना'. आणि जगामध्ये काहीतरी पेरल्याशिवाय काही उगवत नाहीच, वर ज्वारीचं कणीसच्या कणीस उभं रहावं, असं जर वाटतं असेल तर एका कणसाच्या दाण्याला जमिनीत गाडून घ्यावं लागतं. तो शेतात, मातीत मिळतो तेव्हा पुढचं धान्य येतं; मग हिंदुस्थानात पुढची चांगली घर निर्माण होण्यासाठी आपलं घर पेरायला नको का! कुठल्या तरी घरानं मातीत गेल्याशिवाय पुढचं चांगलं कसं उगवणार. माई, कल्पना करा.. की आपण आपल्या हातानं आपली चूल बोळकी फोडून टाकली. आपल्या घराला आग लावली, तर हे पेरल्यामुळेच उद्या स्वतंत्र झालेल्या भारताच्या प्र...

सुदैवाने कोकणात जन्म झाला.....

सुदैवाने कोकणात जन्म झाल्यामुळे हुंड्याचा विषय कधी झालाच नाही. ना कुणाला देताना पाहिलं ना घेताना... ना कोकणात हुंड्यासाठी कुणाचा छळ पाहिला... ना कुणी बागायतदार किंवा त्याची मुलगी आत्महत्या करताना पाहिली... पण कोकण सोडला तर उर्वरित महाराष्ट्रात हुंड्याच्या झळा भयंकर दिसून येतायत...शुक्रवारी हुंड्यासाठी पैसे नाहीत म्हणून लातूरच्या भिसे वाघोलीतल्या शीतल वायाळ या शेतकऱ्याच्या २१ वर्षीय मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. वर्षभरापूर्वी याच गावातल्या मोहिनी पांडुरंग भिसे या शेतकऱ्याच्या मुलीने आत्महत्या केली. १५ दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या आरती पाटील - सावकारने सुद्धा सासरच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून गळफास घेतला. आणखी किती हुंडाबळी घेणार आहोत? पोरीच्या बापाकडे भीक मागताना लाज नाही वाटत का या पापी माणसांना ? लग्नाचा अर्धा - अर्धा खर्च हा प्रकारच लोकांना तिकडे माहित नाही. सरकारकडे गळा काढून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी भांडणारे राजकारणी पाहिले, पण हुंडाबळी विरोधात भांडणारा राजकारणी पाहिला नाही. मराठवाडय़ातील भीषण वास्तवांपैकी एक ते म्हणजे बालविवाह.... आजही मराठवाड्यात ३० टक्के बालविवाह...

आयुष्याचा अर्थ समजावणारी मनोहर पर्रिकरांची कलिंगडाची गोष्ट

आयुष्याचा अर्थ समजावणारी मनोहर पर्रिकरांची कलिंगडाची गोष्ट   साधी राहणी आणि पारदर्शक कारभार ही मनोहर पर्रिकरांची मुख्य ओळख. उच्च शिक्षित असूनही पर्रिकरांनी नेहमीच स्वत:ला तळागाळातील जनतेशी जोडून ठेवले. त्यामुळे आजच्या तारखेला त्यांच्या इतका गोव्यात दुसरा लोकप्रिय नेता नाही. गोव्यात फक्त त्यांच्या नावावरच अन्य पक्षांनी भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे फक्त 13 जागा जिंकूनही आज गोव्यात भाजपाचे सरकार स्थापन झाले. हेच मनोहर पर्रिकर देशाचे संरक्षणमंत्री असताना त्यांनी गुजरातमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांच्या गावच्या कलिंगडांची सांगितलेली गोष्ट भरपूर काही शिकवणारी आहे. पर्रिकरांनी शपथ घेतल्यानंतर त्यांनी सांगितलेली ही गोष्ट पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. कलिंगडातून मनोहर पर्रिकरांनी समजावला आयुष्याचा अर्थ मी गोव्यातील पारा गावचा. त्यामुळे आम्हाला सगळे पर्रिकर बोलतात. माझ गाव कलिंगडाच्या शेतीसाठी प्रसिद्ध होते. मी लहान असताना आमच्या गावातील शेतकरी मे महिन्यात कलिंगड खाण्याची स्पर्धा भरवायचे. जास्तीत जास्त मुलांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बोलावले ...

पर्रीकरांच्या पराभवांची प्रश्नचिन्हं

पर्रीकरांच्या पराभवांची प्रश्नचिन्हं             आधुनिक गोव्याचे शिल्पकार भाऊसाहेब बांदोडकरांची जयंती बाyरा मार्चला गोवाभरात साजरी होत होती. नेमक्या त्याच वेळेस संरक्षणमंत्री म्हणून गोव्यातील राजकारण्यांना मिळालेलं सर्वोच्च पद भूषवणारे मनोहर पर्रीकर दिल्लीतून परतण्यासाठी सर्वस्व पणाला लावत होते. अनेकांनी पर्रीकरांना भाऊसाहेबांच्या थोरवीच्या पंक्तीला बसवण्याचा प्रयत्न केलेला असला तरी त्यांचा तोकडेपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला. हयात असेपर्यंत एकदाही पराभव न पत्करावा लागणाऱ्या भाऊसाहेबांसमोर सर्व साधनं हाताशी असूनही दारूण पराभव झालेले पर्रीकर पुन्हा थिटे ठरले. भाऊसाहेबांनी तेव्हा देशात सर्वशक्तीमान असणाऱ्या काँग्रेसचा एकही आमदार जिंकू दिला नव्हता. आता गलितगात्र काँग्रेसने पर्रीकरांच्या नाकावर टिच्चून जास्त आमदार निवडून आणलेत. भाऊसाहेबांनी बहुजनवादाची पताका फडकावून गोव्याला सर्वसमावेशक प्रगतीच्या वाटेवर नेलं. आज पर्रीकरांच्या भाजपमध्ये ओबीसी आणि दलित आमदारांची वानवा आहे. आज पन्नास वर्षांनंतर भाऊसाहेबांच्या योगदानाची उदाहरणं आपण सहज देऊ शकतो. एकदाही कार्यकाळ पूर...

सावंतवाडी(कुणकेरी)आगळा वेगळा हुडा उत्सव

सावंतवाडी(कुणकेरी)आगळा वेगळा हुडा उत्सव कोकणात धार्मिक कार्यक्रमात शिमगोत्सव काळात आगळा वेगळा अनुभव येतो. प्रत्येक गावात विविध रीतीरिवाजाप्रमाणे शिमगोत्सव साजरा होतो. तसाच कुणकेरी येथील श्री देवी भावईचा हुडा उत्सव सर्वदूर प्रसिद्ध आहे. शिमगोत्सवाच्या सातव्या दिनी हा उत्सव होतो. त्यामुळे हजारो लोक खास उपस्थिती दर्शवितात. कुणकेरी येथील श्री देवी भावईचा हुडा उत्सव १८ मार्च रोजी होत आहे. सागवानी लाकडाची शंभर फुटी उंच होळी उभारली जाते. तिला सजविले जाते, त्यावर अवसारी देव चढण्यासाठी विशिष्ट प्रकारची सोय असते. त्याला हुडा संबोधले जाते. शिमगोत्सव काळाच्या सातव्या दिवशी हुडा उत्सव असतो. शिवाय घोडे मोडणी, हुडा उत्सव सोबतच रोंबाट, कवळे जाळणे अशा विविध कार्यक्रमांनी शिमगोत्सव साजरा होतो. होळीच्या चौथ्या दिवशी चव्हाटय़ावर हळदीचा कार्यक्रम, पाचव्या दिवशी खेळगडय़ांचा कार्यक्रम व दांडय़ांचे रोंबाट घातले जाते. शिमगोत्सवाच्या सहाव्या दिवशी प्रत्येक वाडय़ातील मानाप्रमाणे रोंबाट एकत्र येऊन गुलाल उधळतात. नंतर रोंबाट पुढे श्री देव क्षेत्रपालाचे दर्शन घेण्यासाठी अवसार काठीसह सीमेपर्यंत धावत जातात. श्रींचे ...

मालवणी मुलखात देव किती?

मालवणी मुलखात देव किती? कोकण ही श्रद्धाळू माणसांची भूमी आहे. या भूमीचा अलौकिकपणा येथील संस्कृती आणि देखणेपणा साराच कसा भव्यदिव्य सरंजाम. इथला इतिहासही तितकाच मनोरंजक आणि शौर्यपूर्ण आहे. या निसर्गसंपन्न भूमीत श्रद्धेला अनोखं आणि अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामुळेच हजारो देवराया इथे उभ्या आहेत. या देवरायांमधले निसर्गदेव त्यांची शक्ती, त्यांची गूढ प्रचिती, त्या-त्या भागातल्या लोककथा आणि परंपरा हे सारंच काही अतक्र्य..! सिंधुदुर्गात मंदिरं किती, हा खरंतर चर्चेचा मुद्दाच ठरावा.. देवाचं अस्तित्व चराचरात आहे, असं मानणारी आपली हिंदू संस्कृती. आपण देवाला मनोभावे हाक मारावी आणि त्याची प्रचिती घ्यावी. बिनधास्त पाऊल टाकावं आणि निर्धास्तपणे यश मिळवावं, असा मालवणी मुलखातील रिवाज. पण जिल्ह्यात सुमारे ३ हजार ९७५ मंदिरं आहेत. यातील पश्चिम देवस्थान समितीकडे १९७ मंदिरं आहेत. सर्व गावातील पाषाणे, मूर्तीची संख्या सुमारे ३५ हजार १४२ आहे. याशिवाय निसर्ग देवता, राईतली पाषाणे, देवळाबाहेरचे विरगळ ही श्रद्धेची स्थानेही आहेत. राईतील फांदीही तोडू नये, यासाठी पूर्वापार चालत आलेले काही नियमही आहेत. या देवभूमित पंच...

ज्यांच्या याचिकेने देशातील महामार्गावरील दारूची दुकाने बंद होत आहेत..त्या अफाट माणसाविषयी

ज्यांच्या याचिकेने देशातील महामार्गावरील दारूची दुकाने बंद होत आहेत..त्या अफाट माणसाविषयी जाणून घ्या ज्यांच्या याचिकेने देशातील महामार्गावरील दारूची दुकाने बंद होत आहेत..त्या अफाट माणसाविषयी जाणून घ्या                      हरमनसिंग सिद्धू हे कॅनडात स्थायिक होणार होते परंतु ज्या आठवड्यात जायचे त्याच आठवड्यात २४ ऑक्टोबर १९९६ला त्यांच्या कारला हिमाचल प्रदेशात अपघात झाला. त्या अपघातात त्यांच्या मणक्याला दुखापत झाली व २० वर्षापासून ते व्हील चेअरवर आहेत. त्यामुळे त्यांना कॅनडात जाता आले नाही. तेव्हापासून ते रस्ते सुरक्षा या विषयावर काम करीत आहेत. त्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महामार्गावरील दारू दुकाने हटवावीत असा आदेश दिला. वन मॅन आर्मी म्हणून काम करणारे हरमनसिंग सिद्धू यांच्या Rediff.com ने घेतलेल्या मुलाखतीचा हेरंब कुलकर्णी यांनी केलेला अनुवाद ----------------------------------------------------------------------------------------------------------------------- तुम्ही, दारू पिऊन वाहन चालविणे या विषयावर थेट सर्वोच्च न्यायाल...

ABP माझासाठी सर्वात वाईट दिवस

Image
ABP माझासाठी सर्वात वाईट दिवस मुंबई - ABP माझाच्या इतिहासातील आज ( २ एप्रिल ) सर्वात वाईट दिवस आहे. फेसबुक आणि ट्यूटरवर  # BJPMAJHA  हा हॅश टॅग तयार करून नेटिझन्सनी धो धुतले आहे. संपादक राजीव खांडेकरसह काही जणांची व्यंगचित्रे काढून चांगल्याच शिव्याही हासडल्या आहेत... नेमके कारण काय ? केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार सत्तेवर येण्यापूर्वी आणि आल्यावर ABP माझा वर सतत भाजपच्या बाजूने बातम्या देण्यात आल्या आहेत. सर्व्हे करताना भाजपला फेव्हर राहील याची काळजी घेण्यात येते. ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांना जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात येते.शेतकऱ्याच्या प्रश्नावर विरोधकांनी संघर्ष यात्रा काढली तर एसी मधून संघर्ष यात्रा सुरु अशी टीका करण्यात आली तसेच या संघर्ष यात्रेचे कव्हरेज करण्यात आले नाही... सत्ताधारी मंत्र्याच्या चुकांवर पांघरून घालण्यात येते असा यांचा आरोप आहे. यामुळे ABP माझा ला धडा शिकवण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या नेटिझन्सने ही मोहीम उघडली आणि गेले काही तास शिव्यांची लाखोली सुरु केली आहे.. मीडियासाठी हा सूचक इशारा आहे .. पत्रकारानो ...