ज्यांच्या याचिकेने देशातील महामार्गावरील दारूची दुकाने बंद होत आहेत..त्या अफाट माणसाविषयी

ज्यांच्या याचिकेने देशातील महामार्गावरील दारूची दुकाने बंद होत आहेत..त्या अफाट माणसाविषयी जाणून घ्या ज्यांच्या याचिकेने देशातील महामार्गावरील दारूची दुकाने बंद होत आहेत..त्या अफाट माणसाविषयी जाणून घ्या
                     हरमनसिंग सिद्धू हे कॅनडात स्थायिक होणार होते परंतु ज्या आठवड्यात जायचे त्याच आठवड्यात २४ ऑक्टोबर १९९६ला त्यांच्या कारला हिमाचल प्रदेशात अपघात झाला. त्या अपघातात त्यांच्या मणक्याला दुखापत झाली व २० वर्षापासून ते व्हील चेअरवर आहेत. त्यामुळे त्यांना कॅनडात जाता आले नाही. तेव्हापासून ते रस्ते सुरक्षा या विषयावर काम करीत आहेत. त्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महामार्गावरील दारू दुकाने हटवावीत असा आदेश दिला. वन मॅन आर्मी म्हणून काम करणारे हरमनसिंग सिद्धू यांच्या Rediff.com ने घेतलेल्या मुलाखतीचा हेरंब कुलकर्णी यांनी केलेला अनुवाद
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
तुम्ही, दारू पिऊन वाहन चालविणे या विषयावर थेट सर्वोच्च न्यायालयात धाव का घेतली ?
आपल्या सर्वांनाच माहीत आहे की रस्ते अपघाताचे महत्वाचे कारण हे दारू पिऊन वाहन चालविणे हे आहे आणि दारूची महामार्गावर असलेली सहज उपलब्धता हे त्याचे महत्वाचे कारण आहे. पंजाब,हरियाना व हिमाचल प्रदेशात तुम्हाला दर दोन किलोमीटरमध्ये एक किंवा दोन दारूची दुकाने आढळतील. जर दारू सहज उपलब्ध होत असेल तर मग दारू पिऊन वाहन चालविणे रोखता येणार नाही म्हणून आम्ही थेट सर्वोच्च्च न्यायालयात धाव घेतली.आमच्या याचिकेत आम्ही हाय वे वर चालकाला दारू पिण्याचा मोह होता कामा नये हा मुद्दा मांडला होता.२०१२ पासून आम्ही ही याचिका लढतो आहे. आमच्या बाजूने निकाल लागला याचा आनंद आहे
भारतात दारू पिल्याने किती अपघात होतात ?
भारतात २०१५ च्या आकडेवारीनुसार १.४७ लाख माणसे मरतात. त्यापैकी ४० टक्के अपघात हे दारू पिऊन वाहन चालविल्याने होतात.जगात हे प्रमाण सर्वात जास्त आहे  
पण केवळ दुकाने बंद केल्याने हा प्रश्न सुटेल असे वाटते का ?
दारू पिऊन वाहन चालविणे याबाबत ३ गोष्टी करण्याची गरज आहे.एक दारूची महामार्गावरील दारू सहज उपलब्धता कमी करणे,दुसरे दारू पिऊन वाहन चालविण्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि याबाबतचे कायदे कडक करणे असे ३ उपाय करायला हवेत.पण महामार्गावर सहज दारू उपलब्ध असताना केवळ प्रबोधनाने हे थांबणार नाही. हिमाचल प्रदेशात तर अगदी धोकादायक डोंगराळ रस्त्यावर ही दुकाने असल्याने चालकांना दारू पिण्याचा मोह होतो. त्यामुळे महामार्गावर दारू दुकाने नसलीच पाहिजे
पण या निर्णयानंतर लोक दारू पिऊन गाडी चालविणार नाहीत असे वाटते का ?
नक्कीच.नक्कीच यात काही फरक पडेल. जर मला मुंबईहून गोव्याला गाडीने जाताना दारूची दुकाने दिसली तर मला दारू पिण्याचा मोह होईल आणि जर दुकाने दिसली नाहीत तर मी दारू पिणार नाही  
पण जरी महामार्गावर दुकाने नसतील तरी लोक गाडीत दारूचे पार्सल नेतील ...
ती जबाबदारी कायदा सुव्यवस्थेची आहे.मला फक्त इतकेच म्हणायचे आहे की जगातील कोणत्याही देशात महामार्गावर दारूविक्री केली जात नाही
हा विषय हातात घ्यावा असे तुम्हाला का वाटले ?
मला 20 वर्षापूर्वी गाडीच्या प्रवासात अपघात झाल्याने माझ्या मणक्याला दुखापत झाली.तेव्हापासून मी व्हीलचेअरवर आहे. तेचापसून मी रस्तेसुरक्षा या विषयावर काम करतो आहे. भारतात दर ४ मिनिटाला एक माणूस रस्ते अपघातात मरतो. हे मृत्यू कायदेविषयक सुधारणा करून थांबविता येतील. अवघ्या काही सेकंदात माझे आयुष्य कायमचे बदलून गेले.आमच्या गाडीत ४ व्यक्ति होत्या.मी मागच्या सीटवर होतो.त्या आठवड्यात मी कायमचा कॅनडात स्थलांतर करणार होतो पण या अपघाताने मी कायमचा व्हीलचेअरला खिळलो.  
बिहारची दारूबंदी तुम्ही एक महत्वाचे पाऊल मानता का ?
नाही.माझे अशा निर्णयांना व्यक्तिगत समर्थन नाही. पण तो वेगळा विषय आहे. हे सामाजिक प्रश्न आहेत. माझा प्रयत्न केवळ धोकादायक ठिकाणी दारू विक्री होऊ नये इतकाच मर्यादित आहे
लोक दारू पिऊन वाहन का चालवितात ?याचा काही अभ्यास केला आहे का ?
हे केवळ आनंद आणि मजा यासाठी दारू पिऊन गाडी चालवितात. एकदा दारू पिऊन गाडी चालविली की त्यांना मजा वाटते व त्यात काही अपघात झाला नाही की पुन्हा आपल्याकडून चूक होणार नाही या भ्रमात ते राहतात व ते प्रमाण वाढत जाते
आणखी काही जनहित याचिका आपण दाखल केल्या आहेत का ?
होय.रस्त्यांचे निकृष्ट बांधकाम या विषयावर मी याचिका दाखल केली आहे.रस्ते कसे बांधावेत याचे निकष नक्की केलेले असूनही त्याप्रमाणे रस्ते बांधले जात नाहीत.याविषयावर ही याचिका आहे.यापूर्वी राजस्थानात एका विशिष्ट भागात गाडीच्या चालकांना poppy ची उपलब्धता असायची त्याविरुद्ध मी याचिका करून ती दुकाने बंद केली.
                     हरमनसिंग सिद्धू हे कॅनडात स्थायिक होणार होते परंतु ज्या आठवड्यात जायचे त्याच आठवड्यात २४ ऑक्टोबर १९९६ला त्यांच्या कारला हिमाचल प्रदेशात अपघात झाला. त्या अपघातात त्यांच्या मणक्याला दुखापत झाली व २० वर्षापासून ते व्हील चेअरवर आहेत. त्यामुळे त्यांना कॅनडात जाता आले नाही. तेव्हापासून ते रस्ते सुरक्षा या विषयावर काम करीत आहेत. 

Comments