Posts

रात्रीस खेळ चाले: विचार करण्यासारखी पोस्ट...

ेरात्रीस खेळ चाले: विचार करण्यासारखी पोस्ट By Anirudha W Prabhuशेवटचा paragraph नक्की वाचा.मला एक कळत नाही कि का सगळे या serial च्या जीवा वर का उठले आहेत. रोजच्या सास बहु ड्रामा पेक्षा चांगली serial बघायला मिळत आहे तर त्यात सुद्धा प्रोब्लेम. serial पूर्ण मालवणीत दाखवू शकत नाहीत कारण अक्ख्या महाराष्ट्रातच नाही तर दुबई आणि लंडन मधेय सुद्धा मराठी प्रेक्षक वर्ग आहे झी मराठी channel चा. सगळ्यांना मालवणी समजत नाही म्हणून 60:40 ratio वापरून मराठी आणि मालवणी भाषा तयार केली आहे. सर्व पात्रांचा उत्तम अभिनय, उत्कृष्ट पार्श्वसंगीत, सुंदर दिग्दर्शन, आणि आवर्जून उल्लेख करायचा तर मराठीत प्रथमच serial साठी वापरलेला drone कॅमेरा. या drone कॅमेराने जी काय दृश्ये टिपलीत ती तर अतिशय सुंदरच आहेत. काही वेळा रोहित शेट्टीचा आवडता कॅमेरामन Mr. Dudly ची आठवण येते. या कॅमेरामन ची lighting ची पद्धत सुद्धा हटके आहे. प्रत्येक frame मधेय फार काळजी घेतली गेली आहे. आता आरडओरड चालली आहे ती अंधश्राद्ध्येबद्दल. जे काही दाखवले आहे ते फ़क़्त एका कुटुंबापर्यंत मर्यादित आहे. संपूर्ण कोकणी माणसाला आणितेथे येणाऱ्या जाणार्या प्र...

भाड्याची सायकल

🚲 *भाड्याची सायकल* १९९०-९१ चा काळ होता तो... त्यावेळेस आम्ही लोकं भाड्याने छोटी सायकल घेत होतो... बहुधा ती लाल रंगाची असायची जिला कँरीअर नसायचे, ज्यामुळे तुम्ही कुणाला डबल सिट नेऊ नये हा उद्देश असायचा. 😀 भाडे जेमतेम ५० पैसे ते १ रू तास च्या आसपास होतं. दुकानदार भाडे पहिले घ्यायचा आणि आपले नाव त्याच्या रजिस्टर वर नोंदवायचा. 📝 घराच्या जवळ असे अनेकजण सायकल दुकानदार होते... 👉🏻 भाड्याचे नियम कडक असायचे. ● जसे पंचर झाली तर त्याचे वेगळे पैसे, तुटफुट आपली जबाबदारी... मग त्या सायकल वर आम्ही गल्लीतले युवराज सवार व्हायचो 🤠 पुर्ण ताकदीने पायडल मारत , कधी हात सोडत बँलेंस करत , कधी खाली पडुन पुन्हा उठून चालवायचो. आपल्या गल्लीत येऊन सर्व मित्र आळीपाळीने सायकल चालवायला मागायचे.  भाड्याच्या टाईमाचा लिमिट निघुन न जावा ⏱ म्हणून तीन चार वेळेस त्या दुकानापासुन चक्कर व्हायची... 💫 तेव्हा भाड्याने सायकल घेणं , हे आमच्या श्रीमंतीचे लक्षण होतं... 🤩 स्वतः ची लहान सायकल असणारे त्यावेळेस खुप रईसी झाडायचे... 🧐 एव्हाना आमच्या घरी तेव्हा मोठी काळी अँटलस सायकल आणली , 🚲 पण तिला स्टँड...

विदेशी झाडे का नकोत ?

CP विदेशी झाडे का नकोत ? -  मादागास्कर येथून भारतात आलेल्या गुलमोहराने, ऑॅस्ट्रेलियातून भारतात आणल्या गेलेल्या निलगिरी, १९७२ साली आयात केलेल्या गव्हा ( मिलो ) बरोबर भारतात आलेली  सुबाभूळ, पेल्ट्रोफोरम, अकेशिया, स्पॅथोडिया, कॅशिया, ग्लिरिसिडीया, फायकस , सप्तपर्णी , रेन ट्री या झाडांनी आज हजारो एकरांवर डेरा जमवून आपल्या आम्लयुक्त पानांमुळे आपल्या आसपासची जमीन नापीक केली आहे ....  दक्षिण अमेरिकेतून आपल्याकडे आलेल्या गव्हाबरोबर तिकडचे पार्थेनियम तण बीच्या स्वरूपात आपल्याकडे आले आणि स्थानिक पर्यावरणात या तणाने हाहाकार माजवला .... आपण त्याला गाजर गवत आणि काँग्रेस गवत म्हणतो ....  पण ह्याचे निर्मूलन काही आपल्याला करता आले नाही कारण हे स्थानिक तण नसल्याने त्याला खाऊन फस्त करणारे जीवच इथल्या स्थानिक अन्नसाखळीत नांदत नसल्याने, त्याची बेसुमार वाढ झाली .... अशा प्रकारे विदेशी झाडांची केलेली लागवड आपल्या जीवनचक्रावर परिणाम करत असल्याचे दिसत आहे ... या झाडांच्या फुलात परागकण नाहीत त्यामुळे त्यावर फुलपाखरासारखे कीटक येत नाहीत ... या झाडांच्या मुळांनी जमिनीतील पाणी शोषून घेतल्यान...

राजापूरची गंगा.

मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिणेला राजापूर. नावाचं रम्य गाववजा शहर आहे. राजापूरवरून गोव्याकडे जाताना अर्जुना नदीवरचा पूल आणि नंतरचा छोटा घाट ओलांडल्यावर शहरापासून तीन-साडेतीन किलोमीटरवर उन्हाळे नावाचं गाव लागतं. तिथे दर तीन वर्षांनी गंगा प्रकटते. गंगावतरण झाल्यावर महाराष्ट्र तसंच गोव्यातीलही दूरदूरच्या ठिकाणांवरून भाविक तिथं येतात. तिच्या अकस्मात येण्याजाण्याच्या निसर्गाच्या चमत्काराचे सर्वांनाच अप्रूप! राजापूरची गंगाजिऑलॉजिकल सर्व्हे विभागातील इंग्रजकालीन अधिकारी सी. जे. विल्किन्सन याने कोकणातील भूगर्भरचनेबाबत अभ्यास केला होता. त्याच्या अभ्यासाधारे रत्नागिरीच्या गॅझेटमध्ये राजापूरच्या गंगेबाबत उल्लेख आढळतो. ते पाणी भूगर्भातील हालचालींमुळे सायफन प्रणालीने प्रवाहित होत असावे, असे त्यात म्हटले आहे. मेदिनी पुराणातही त्याचा उल्लेख आहे. स्थानिक दंतकथेनुसार, गंगाजी साळुंके नावाचा कुणबी दरवर्षी पंढरपूरला जात असे. वयोमानानुसार त्याला जाणे जमेनासे झाले, त्यावेळी शेतात काम करताना तो रडू लागला. तेव्हा त्याची आयुष्यभरची सेवा पाहून शेतातल्या एका वटवृक्षाजवळ प्रत्यक्ष गंगा प्...

गुढीपाडवा आणि वस्तुस्थिती - एक निरीक्षण ........

गुढीपाडवा आणि वस्तुस्थिती - एक निरीक्षण ........ पहीला गुढी पाडवा साजरा झाला ई.स.78 साली मराठवाड्यातील पैठण या शहरात! गौतमीपुत्र सातकर्णी या सातवाहन राजाने शकांवर मिळवलेल्या विजयाचे प्रतिक म्हणून हा सण सुऱू झाला. सातवाहनांचा उल्लेख  आंध्रभृत्य म्हणून होत असला तरीही, पैठण मधील जनमान्यतेनुसार  सातवाहन राजाचे पालनपोषण कुंभार कुळात झाले होते, स्वाभिविकपणे घडा किंवा कलश हे त्याचे कुलचिन्ह म्हणून रेश्मी वस्त्रासोवत घडा काठीवर ठेऊन खारीक खोब-याच्या हारासह गुढी उभारली गेली. पुर्वी विजयाचे प्रतिक म्हणून सम्राट राजधानीत व कुलदैवतेसमोर दगडी विजयस्तंभ निर्माण करत असतं! गुढी या अशा विजयस्तंभाचं लोकप्रिय प्रतिक म्हणावे लागेल आणि यावरून सातवाहनांच्या लोकप्रियतेचाही अंदाज येतो. कांही संशोधकांनी असेही एक मत मांडले आहे  की, शक ही कालगणना सातवाहनापुर्वी उजैनच्या कुशान सम्राट कनिष्कने किंवा चष्टनाने  सुरू केली होती आणि  महाराष्ट्रात ती सन 78 मधे सातवाहनांनी सुरू केली. अर्थात ती सातवाहनाऐवजी कनिष्क राजांनी सुरू केली असल्याचे खरे असेल तर पाडवा हा सण सातवाहन पूर्व कालखंडातही होता...

हरवत चाललेल्या आठवणी... खळा...

*हरवत चाललेल्या आठवणी...*                 *खळा...*       कोकणातल्या प्रत्येकाच्या दारात आढळणारा शेणान सारयलेला "खळा"( अंगण)  अाता हळू हळू नजरेआड होताना दिसता. कोकणातला घर  आनी दारात खळा नाय असा होवकच शकना नाय.         म्हणाक "खळा" हे निसते दोनच  शब्द असले तरी बरेच आठवणी, गजालींचे मैफिली , बरेच चाली रिती , चांगले वाईट अनुभव  ह्या खळ्यान आपणाक दिलेत.  दिवाळेची चाहूल लागली काय कोकणात खळा करूची लगबग सुरू झालीच म्हणान समजा. अवाटातल्या (वाडीतल्या) सगळ्यांनी एकमेकांका मदत करून  खळी करूक घ्यायची खळा खणान झाला काय चिखलावन  पेटण्यान ( कोकणात जमीन केल्यावर दाब देउन घट्ट करण्याच लाकडी साधन) व्यवस्थित लेवल करून पावसाचा पानी जावच्या बाजूक डोळ्यान न दिसणारो उतार करून पेट देवच्यासाठी खळा दोन दिवस तसाच सोडून द्यायचा. खळा ईला म्हणजे पेळे आनी वसरी ईलीच. खळा करतानाच ते  मातीन व्यवस्थित लिपान तेंका छानसो आकार देवन   पेळे आनी वसरी तयार करायचे. सकाळ, संध्याकाळ  खळा सुकासर तेक...

‘वस्त्रहरण’ नाबाद ५०००

‘वस्त्रहरण’ नाबाद ५००० १९६२ मध्ये लिहिल्या गेलेल्या ‘आज काय नाटक होवचा नाय’ या एकांकिकेचं ‘वस्त्रहरण’ म्हणून नामांतर होतं काय, आणि आपटत-धोपटत गेली ५४ वर्षे हे नाटक जन...