रात्रीस खेळ चाले: विचार करण्यासारखी पोस्ट...

ेरात्रीस खेळ चाले: विचार करण्यासारखी पोस्ट By Anirudha W Prabhuशेवटचा paragraph नक्की वाचा.मला एक कळत नाही कि का सगळे या serial च्या जीवा वर का उठले आहेत. रोजच्या सास बहु ड्रामा पेक्षा चांगली serial बघायला मिळत आहे तर त्यात सुद्धा प्रोब्लेम. serial पूर्ण मालवणीत दाखवू शकत नाहीत कारण अक्ख्या महाराष्ट्रातच नाही तर दुबई आणि लंडन मधेय सुद्धा मराठी प्रेक्षक वर्ग आहे झी मराठी channel चा. सगळ्यांना मालवणी समजत नाही म्हणून 60:40 ratio वापरून मराठी आणि मालवणी भाषा तयार केली आहे. सर्व पात्रांचा उत्तम अभिनय, उत्कृष्ट पार्श्वसंगीत, सुंदर दिग्दर्शन, आणि आवर्जून उल्लेख करायचा तर मराठीत प्रथमच serial साठी वापरलेला drone कॅमेरा. या drone कॅमेराने जी काय दृश्ये टिपलीत ती तर अतिशय सुंदरच आहेत. काही वेळा रोहित शेट्टीचा आवडता कॅमेरामन Mr. Dudly ची आठवण येते. या कॅमेरामन ची lighting ची पद्धत सुद्धा हटके आहे. प्रत्येक frame मधेय फार काळजी घेतली गेली आहे. आता आरडओरड चालली आहे ती अंधश्राद्ध्येबद्दल. जे काही दाखवले आहे ते फ़क़्त एका कुटुंबापर्यंत मर्यादित आहे. संपूर्ण कोकणी माणसाला आणितेथे येणाऱ्या जाणार्या प्रत्येक माणसाला भूताने झपाटले असे काही दाखविले गेले असते तर गोष्ट वेगळी. प्रतेय्क चांगल्या गोष्टीत कीस काढायचा आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारायचा हा negative मराठी बाणा आम्ही कधी संपवणार. कोकणातल्या परंपरा व्यवस्थित दाखविल्यानाहीत यावर सध्या बोंब चालू आहे. एवढीच realistic बघायची खाज आहे तर Discovery channel वर भारत एक खोज बघा किंवा जब्बार पटेल चे art movie बघा. अमर अकबर अंथोनी मध्ये तीनही भाऊबेड वर झोपून आप आपल्या हाहात सुया टोचून त्यातले रक्त गुर्त्वाकार्ष्णाच्या नियमा विरुद्ध वर एकाच बाटलीत जाते आणि त्याच बाटलीतले रक्त निरुपा रोय हिच्या हातात दुसर्या बाजूला जाते, हे चालते, सलमान खान ५.४ इंच आणि त्याच्या समोर ऐश्वर्या रोय ६.२ इंच हेरोइने, हे चालते. ह्याला actually cinematic Liberty म्हणतात. प्रत्येक वेळेला serial किंवा cinema बनविताना हिचा benefit घ्वावा लागतो. मी स्वतः कोकणातल्या परंपरे विरुद्ध नाही पण काही गोष्टीना फाटा दिला तर काही बिघडत नाही. It is an entertainment purpose only. एक विरंगुळा आहे तेवढाच. you tube वर विरार पश्चिमे ची national शाळे बाजूची इमारती बद्दल संपूर्ण विरार सत्य घटना नावाचा horror सिनेमा बघायला मिलेले, तो सिनेमा बघून विरार वेस्ट ला माणसे राहत नाहीत असे नाही. मुंबई मध्ये मुकेश मिल हि सर्वात haunted place म्हणून ओळखली जाते, तरी पण तिथे कायम शूटिंग चालू असते. त्यामुळे हे serial बघून कोकणात पर्यटन वर फरक पडेल अशी जी बोंब उठविली जात आहे त्यात काहीही तथ्य नाही.कोणताही पेला हा कधीच पूर्ण भरलेला नसतो, तो किती भरलेला आहे हे जाणून घेण्याची आणि किती रिकामा आहे हे दुर्लक्ष करण्याची तयारी जो पर्यंत मराठी माणसाच्या मनात येत नाही तो पर्यंत त्याची प्रगती थांबली असेच समजायचे.In Short : प्रत्येक चांगल्या गोष्टीत वाईट गुण शोधण्याचे काम दुर्योधने कायम केले, तर प्रत्येक वाईट गोष्टीत चांगले गुण शोधण्याचे काम युधिष्टीराने केले.आपण काय करायचे ?       ही मालीका अशीच चालो अस आपल मत आहे ना तर नक्‍की शेर करा.

Comments