अभिमान आसा......मी सिंधुदुर्गचो “झिल” असल्याचो

सिं धु दु र्ग -  माझा जिल्हा

|| सिंधुदुर्ग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा ||

१ मे १९८१ या महाराष्ट्र दिनाच्या शुभ मुहूर्तावर सिंधुदुर्ग जिल्ह्याची अधिकृत घोषणा झाली आणि महाराष्ट्राच्या एका महत्वाच्या जिल्ह्याची निर्मिती झाली.  आपले आस्तिव दाखवण्याची या प्रदेशाला संधी मिळाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याने त्या संधीचे सोने केले.  प्रत्येक प्रांतात आपला ठसा उमठवला.

या जिल्ह्याने आणि या मातीतील गुणानुसार येथील मालवण्याने कधीच लाचारी पत्करली नाही. दुष्काळ पडो कि पूर येवो, येथून सरकार दरबारी हात पसरल्याची नोंद मिळणार नाही. निसर्गाने तर या जिल्ह्यावर उदारता नेहमीच दाखवली. पण निसर्गाने तोंड फिरवले तरी येथील शेतकरी कधी निराश झाला नाही आत्महत्या करत नाही.  पेजेवर अर्धपोटी राहील पण स्वाभिमान सोडणार नाही. देव आणि देवचार मानणारे हे श्रद्धाळू सिंधुदुर्गवासिय.

या सिंधुदुर्गात कुठेही उभे राहा एक सुंदर निसर्गचित्र तुम्हाला दिसेल. आंबोली सारखे थंडगार हिल स्टेशन. एका पेक्षा एक देखणी मंदिरे, इतिहासाची साक्ष देणारे किल्ले आणि एका पेक्षा एक सुंदर समुद्र किनारे.  जे आहे त्याची तुलना इतर कुठल्या प्रदेशाची करू नये एवढे अप्रतिम.

आंबा, फणस, काजू, जांभूळ, करवंदे, कोकम, नारळ अशी अनेक फळे, भाताचे पिक मुबलक, उकड्या तांदळाची पेज, कोंबडी वडे (वडे सागोती), घावणे, आंबोळी, शिरवाळे, खापरोळ्या, न्हेवरे, पिठी भात, ओल्या काजूची उसळ  आणि शेवटी सोलकढी असे सर्व चविष्ट खाद्य देणारा हा जिल्ह्या.
 
सिंधुदुर्ग जिल्ह्याने आम्हाला एक ओळख दिली. एक स्वाभिमान दिला. एक संस्कृति दिली. या प्रदेशाची प्रगती सदोदित घडो आणि महाराष्ट्रच काय पण अखंड भारत देश्यात या जिल्ह्या सदोदित आघाडीवर रहावा अशी आशा करूया.

अभिमान आसा......मी सिंधुदुर्गचो “झिल” असल्याचो !

Comments